जयहिंद युवा मंच
जयहिंद लोकचळवळ सुदृढ समाज निर्मितीचे स्वप्न घेऊन काम करीत आहे. ही एक समाज परिवर्तनाची चळवळ आहे. आपल्या देशासमोर भ्रष्टाचार, राजकारणातील गैरप्रकार, झुंडशाही धर्माच्या नावाने राजकारण, दारिद्र्य, बेरोजगारी अशी अनेक मोठी आव्हाने आहेत. आपल्याला आपल्या विचारात व कृतीत खूप मोठे बदल करावे लागतील. ही आव्हाने पेलवयाची असल्यास युवकांच्या सहभागाशिवाय अशक्य आहे. जगभरातील सामाजिक-राजकीय क्रांती युवकांनी घडवून आणल्या आहेत. शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या युवावर्गात प्रचंड क्षमता आहे या क्षमतांचा व युवकांच्या संवेदनशील मनाचा सहभाग चळवळीच्या यशासाठी अत्यंत मोलाचा आहे. जयहिंद लोकचळवळीचा युवावर्ग हा आत्मा आहे. जयहिंद युवामंच या स्वतंत्र व्यासपीठाद्वारे मार्फत युववर्गाला संघटित करून त्यांना प्रशिक्षित करणे, व्याख्याने, शिबिरे व ऑनलाइन ट्रेंनिगद्वारे युवकांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे.
- शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करणे.
- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षणासाठी साहाय्य करणे तसेच युवकांसाठी कला सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविणे युथ फेस्टिवल आयोजित करणे.
- युवकांना राजकारणातील मूलभूत संकल्पनांविषयीचे प्रशिक्षण देणे.
- रोजगार निर्मितीचा विशेष कार्यक्रम राबविणे.
- प्रगल्भ विचारांचा, उच्च नैतिक मूल्यांचा राजकीयदृष्ट्या सतर्क असा युवक या चळवळीचा खरा आधारस्तंभ ठरेल.
- शासकीय पातळीवर सर्वंकष युवाधोरण आखण्यास पाठपुरावा करणे.
जयहिंद युवती मंच -
आजच्या युवती या भावी समाज घडविणारा मुख्य घटक आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी युवती मंच पुढील उपक्रम राबवितात.
- आपत्तीग्रस्त ठिकाणी मदत पाठविणे.
- अभ्यास दौऱ्याचे आयोजन करणे.
- फ्लॉवर डेकोरेशन व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करणे.
- स्वतःच्या वाढदिवशी शाळेला पुस्तके भेट देणे.
- दंडकारण्य अभियानामार्फत वृक्षलागवड करणे.
- विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्य भेट देणे.
- आरोग्य शिबिरे राबविणे.
- व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन.
- विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन करणे.
- स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व्याख्यानांचे आयोजन करणे.
- दिव्यांग व इतर मुलींसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करणे.
ऊठ, जागे व्हा आणि ध्येय गाठण्यापर्यंत थांबू नका - स्वामी विवेकानंद