शिक्षण :

जागतिक दर्जाची गुणवत्तापूर्ण व सर्वांसाठी विशेषत: वंचित घटकांसाठी सुलभपणे उपलब्ध होईल अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करणे हे सुदृढ समाज निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भारतात स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा विस्तार खूप झालेला आहे हे मान्य करावे लागेल. 10% हून कमी साक्षरतेचे प्रमाण स्वातंत्र्यानंतरचे होते ते आता जवळपास 80 % पर्यंत गेलेले आहे. व्यवसायिक शिक्षणात इंजिनीअरिंग, मेडिकल यांनी मोठी झेप घेतलेली आहे. तथापि आजही 20 % लोक निरक्षर आहेत, म्हणजेच अमेरिकेच्या लोकसंख्येइतक्या लोकांना अक्षर ओळख नाही. हे लोक आदिवासी, मागासवर्गीय, महिला प्रवर्गातून येतात. मानवाच्या सबलीकरणाचे माध्यम म्हणून शिक्षणाकडे पाहिल्यास, वंचित घटकांना शिक्षणापासून दूर ठेवल्यास समाज सुदृढ होऊ शकणार नाही. शासनाबरोबरच समाजाने देखील शिक्षण क्षेत्रात योगदान दिले पाहिजे. प्रत्येक घरापर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे, अशी राष्ट्रीय चळवळ उभी राहिली पाहिजे.

उपक्रम:

  • पूर्व प्राथमिक शिक्षण - ग्रामीण, शहरी भागातील वंचित घटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्था गावागावात निर्माण करणे.
  • शाळेच्या वेळे व्यतिरिक्त लर्निंग स्किल, रीडिंग मेथड्स अशा माध्यमातून त्यांची बौद्धिक क्षमता उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
  • वाचन, लेखन व भाषण प्रकल्पांचे आयोजन केले जाते. तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते.
  • गुणवत्तावाढीबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
  • गरीब कुटुंबातील मुलांना / मराठी माध्यमाच्या मुलांना उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
  • उच्चमाध्यमिक विद्यार्थ्यांसाठी जयहिंद करिअर अकॅडमी मार्फत CET, NEET, JEE बरोबरच फिजिक्स, केमिस्ट्री, Maths, मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले जाते.
  • अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटरचे बेसिक प्रशिक्षण दिले जाते.
  • बारावीपर्यंत मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे, तसेच अन्य क्रीडा, कला या बाबींकडेही लक्ष वेधण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात.
  • "शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून वाटचाल करीत आहेाल करीत आहे"

    शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे जे आपण जग बदलण्यासाठी वापरू शकता. - नेल्सन मंडेला