जयहिंद वाचन चळवळ -
वाचनामुले आपले विचार समृद्ध होतात, व्यक्तिमत्व संपन्न होते. विशेषतः मुलांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण करणे व त्याद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, भाषेचा, मूल्यांचा विकास करणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. मुलांबरोबरच प्रौढ स्त्री-पुरुषांमध्ये, युवक- युवतींमध्ये देखील ही आवड निर्माण करण्याचा उद्देश आहे. वाचनामुळे मुलांबरोबरच मोठ्यांची भाषा सफाईदार होते. याची सुरुवात लहानपणापासूनच व्हावी म्हणून पाच-पाच मुलांचा गट करून त्यांना वाचायला प्रेरित करणे. त्यांनी पुस्तक वाचल्यानंतर त्याचे आशय सादरीकरण करणे व त्या पुस्तकाचा सारांश लिहिणे अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आकलनक्षमता व अभिव्यक्तीची देखील क्षमता वाढते.
गावोगाव वाचनालये निर्माण करून ते कार्यरत ठेवणे व त्याद्वारे फिरते वाचनालय, व्याख्यानमालेचे आयोजन करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. लेखन वाचन कसे करावे यावर प्रशिक्षण देणे, सुप्रसिद्ध लेखकांशी वार्तालाप ठेवणे. भाषा विकास हा खऱ्या अर्थाने सर्व विषयातील आकलन व प्रवीणतेचा पाया आहे. वाचन चळवळीमुळे योग्य ती पुस्तके वाचनात आली व पुस्तकाचा हेतू व आशय समजला तर मुलांमध्ये चांगली मुल्ये रुजतात. त्यामुळे मुलांना जीवनात ध्येय ठेवणे व त्याच्या पूर्तीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळते. सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी नैतिक मूल्यांचे संवर्धन हे अत्यंत मोलाचे आहे. वाचन चळवळीमुळे हा हेतू साध्य होईल प्रत्येक महिन्यात दोन पुस्तके जरी वाचली आणि त्यांचे आकलन झाले, तरी मुलांची पाचवी ते दहावीपर्यंत दरवर्षी वीस पुस्तके याप्रमाणे सुमारे शंभराहून अधिक पुस्तके वाचून होतील व त्यांचे ज्ञानविश्व समृद्ध होईल.
"एक सर्वोत्कृष्ट पुस्तक शेकडो चांगले मित्रांसारखे आहे, एक चांगला मित्र लायब्ररीच्या समान आहे.मान आहे ." -डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.