जयहिंद क्रीडा मंच

सामाजिक स्वास्थ्यासाठी क्रीडा हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. खेळल्याने व्यक्तीची शारीरिक व मानसिक सुदृढता उत्तम होते. क्रीडांगणावर सामाजिक भेद गळून पडतात. पराभव मान्य करण्याची व पचविण्याची सवय क्रीडांगणावर होते. सामाजिक मुल्ये रुजवण्यासाठी जयहिंद लोकचळवळ क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष देते. क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्पर्धेतील गुणवंतांना प्रशिक्षण देण्याची योजना जयहिंदने केलेली आहे.

बेरोजगारीमुळे युवकांमध्ये निर्माण झालेली वैफल्य व व्यसनाधीनता दूर होऊन खेळाने आणि मानसिक स्वास्थ्य निश्चित सुधारेल!!

उपक्रम

  • क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
  • उन्हाळी व हिवाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात.
  • युवतींसाठी संरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.
  • यशस्वी खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
  • ग्रामीण भागात गायरान जमिनीवर क्रीडांगणांची निर्मिती करणे.
  • गावोगावी मुला-मुलींसाठी स्पोर्ट्स क्लब स्थापन केले आहेत.
  • सॅटरडे / संडे क्लब द्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना शनिवार /रविवार एकत्र आणून प्रशिक्षण दिले जाते.

युवकांनी खेळ खेळले पाहिजे! खेळ खेळल्यानंतर त्यांना गीता अधिक चांगली समजेल, आपण ज्या समाजात राहतो तो समाज सुदृढ, सामर्थ्यवान करण्यासाठी खेळ हे सर्वोत्तम माध्यम आहे!!" " स्वामी विवेकानंद