उद्योग व स्वयंरोजगार

बेरोजगारी ही जगाला भेडसावणारी प्रमुख समस्या आहे. नोटबंदी, जीएसटी व कोरोनाचे संकट यामुळे या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. बेरोजगारीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तरुण वैफल्यग्रस्त होतात. व्यसनाधीनता वाढू शकते. सामाजिक परिस्थिती बिघडू शकते. बेरोजगारी हे मोठे आव्हान आहे. मोठे उद्योग,लघु व मध्यम उद्योग निर्माण करणे हे शासनाचे, राज्यकर्त्यांचे काम आहे. परंतु सेवाभावी संस्था म्हणून जयहिंद पुढील उपक्रम राबवून तरुणांना प्रेरणा देण्याचे काम करते.

उपक्रम
  • या विभागातील ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी विविध योजनांची माहिती पुरवण्याचे काम सातत्याने होत असते.
  • तरुणांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी कौशल्य विकासाचे विविध कार्यक्रम राबविले जातात.
  • रोजगार निर्माण करणे व त्याच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात करणे यासाठी मार्गदर्शन केले जाते.
  • कुटीरउद्योग, कृषी संलग्न जोडधंदे तसेच महिला बचत गटामार्फत छोटे-छोटे व्यवसाय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययोजना राबविल्या जातात.
  • उद्योगधंद्यांना मार्गदर्शन करणे, आर्थिक साहाय्य, तांत्रिक व्यवस्थापन, पणन व्यवस्था, उद्योगाची निवड इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले जाते.
  • उद्योगासंदर्भातील माहिती सर्व स्तरापर्यंत पोचविण्यासाठी Whatsapp, Facebook, You-tube या माध्यमांचा आवश्यकतेनुसार वापर केला जातो.

उद्योजक नेहमीच बदलासाठी शोध घेतात, त्यास प्रतिसाद देतात आणि संधी म्हणून उपयोग करतात -पीटर ड्रकर