Healthy Village Project Related Online Meeting with Satyajeet Tambe
Jaihind People's Movement - जयहिंद लोकचळवळ"" ची सर्व विभागप्रमुखांची आज महत्त्वपूर्ण बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे जयहिंद युवा मंचचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रामुख्याने जयहिंद मध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचे संघटन करणे, जयहिंद लोकचळवळणे दत्तक घेतलेल्या 12 गावांमध्ये जयहिंद सुदृढ ग्राम योजना राबविणे, इतर गावातील अडीअडचणी संदर्भाने वेळोवेळी गावांमध्ये संपर्क करणे व कामांचे नियोजन करणे, जयहिंद शिक्षण विभागामार्फत लहान मुलांना ऑनलाईन लेक्चर / गोष्टीची पुस्तके, ऑडिओ क्लिप्स माध्यमातून लहान मुलांना वाचनाची, ऐकण्याची आवड लावणे. व इतरही विविध विषयांवर चर्चा झाली. सध्याच्या ऑनलाईन गोष्टींमुळे खूप गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. आपली चळवळ ही व्यक्तीकेंद्रित नसून विचारकेंद्रित आहे. आपणा सर्वांना मिळून जयहिंद लोकचळवळ (बिगर राजकिय संस्था) भारतातील सर्वात मोठी संस्था बनवायची आहे. जी सुदृढ समाजासाठी काम करेल, असे यावेळी सत्यजीत तांबे यांनी सांगितले. समवेत जयहिंद चे सर्व विभाग प्रमुख, जयहिंदचे समन्वयक संकेत मुनोत व आदी उपस्थित होते. #JaihindPeoplesMovement #जयहिंद_लोकचळवळ जागर लोकशाहीचा, निर्धार तरुणांचा, संकल्प सुदृढ समाजाचा!