जयहिंद लोकचळवळ आयोजित संविधान प्रचारक कार्यशाळा व "संविधान संसाधन केंद्र" (Constitution Resource Centre) उदघाटन समारंभ !
जयहिंद लोकचळवळ व सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय, संगमनेर व संविधान प्रचारक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधानिक मुल्यांचा प्रचार व प्रसार करणारे तसेच, अभ्यासकांना संविधानाच्या अनुषंगाने लागणारे साहित्य व संसाधने उपलब्ध करून देणारे ""संविधान संसाधन केंद्र"" (Constitution Resource Centre) उदघाटन समारंभ नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ.दिनानाथ पाटील, डॉ.हेमलता राठोड, संविधान प्रचारक प्रा. नागेश जाधव, संविधान प्रचारक संदीप आखाडे, स्वप्निल मानव, कोमल दुर्गुडे, प्रा.नवनाथ नागरे, प्रा.नानासाहेब दिघे आदिंसह विद्यार्थी प्रतिनिधी तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. #जयहिंद_लोकचळवळ #jaihindpeoplesmovement