महाराष्ट्र राज्य कृषी सप्ताहानिमित्त जयहिंद फार्मर प्रोड्युसर कं.लि.आयोजित ‘युवा शेतकरी मेळावा’ तसेच ‘पुरस्कार वितरण सोहळा 2021 आज महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री व जयहिंद लोकचळवळचे मार्गदर्शक मा.ना. बाळासाहेब थोरात व जयहिंद लोकचळवळचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत पार पडला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व प्रोत्साहनात्मक कार्य करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील विविध गावातील महिला व शेतकरी यांचा सन्मान सत्कार सोहळा जयहिंद कृषी विभागामार्फत करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, जयहिंद सुदृढ ग्राम विभागाचे विभागप्रमुख अॅड.सुहास आहेर, सर्व पुरस्कार्थी, प्रा.बाबा खरात, कृषी विभागप्रमुख डॉ. अभय जोंधळे, उपविभागीय अधिकारी मा.शशिकांत मंगळुरे, उपविभागीय कृषी अधिकारी मा.सुधाकर बोराळे, तहसीलदार मा.अमोल निकम, प्रगतशील शेतकरी व महिला, आदिंसह जयहिंद लोकचळवळचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.