जयहिंद लोकचळवळ अंतर्गत ‘सुदृढ ग्राम’ प्रकल्पाच्या अनुषंगाने कृषी विभागाची महत्वपूर्ण आढावा बैठक जयहिंद लोकचळवळ चे संस्थापक अध्यक्ष मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. यावेळी प्रामुख्याने एकात्मिक शेती, फळबाग लागवड, वनशेती, पशुपालन, मत्स्यपालन, कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांचे तांत्रिक सहकार्य, माती परीक्षण, पाणी परीक्षण, जल संधारण, रोजगार हमी योजना, बायोगॅस, कंपोस्ट खत प्रकल्प, नाडेप आणि इतर शासकीय योजना या विषयांवर सविस्तर चर्चा होऊन पुढील धोरण ठरविण्यात आले. सदर बैठकीस तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, जयहिंद लोकचळवळचे कृषी विभागाचे प्रमुख डॉ.अभय जोंधळे, प्रशांत नाईकवाडी आदिंसह जयहिंद कृषी विभागात कार्यरत असणारे मान्यवर उपस्थित होते.